Smartphone Cooling Tips: राज्यात सध्या अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला असून आता लोकांना उन्हाच्या चटक्यांचा तीव्र सामना करावा लागत आहे. अशातचं वाढत्या उष्णतेमुळे स्मार्टफोन देखील जास्त गरम होत आहे. यामुळे फोनची कार्यक्षमता कमी होतेच, शिवाय बॅटरी जलद संपते आणि डिव्हाइसला कायमचे नुकसान देखील होऊ शकते. जर तुमचा स्मार्टफोन नेहमीपेक्षा जास्त गरम वाटत असेल, तर तो थंड ठेवण्यासाठी आणि चांगले काम करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही महत्त्वाचे उपाय सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला असे उपाय सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही या उन्हाळ्यात तुमचा फोन थंड ठेवू शकता.
'या' टिप्स फॉलो करून तुमचा स्मार्टफोन ठेवा कूल -
सूर्यप्रकाशापासून फोनचे रक्षण करा -
तुमचा स्मार्टफोन फक्त काही मिनिटे थेट सूर्यप्रकाशात राहिल्याने जलद गरम होऊ शकतो. तुम्ही समुद्रकिनारी असाल, गाडीत बसला असाल किंवा खिडकीजवळ बसला असाल, तर तुमचा फोन नेहमी सावलीत ठेवण्याचा प्रयत्न करा. फोन कापडाने झाकल्याने किंवा इन्सुलेटेड बॅगमध्ये ठेवल्याने तो जास्त उष्णतेपासून वाचतो.
दुपारच्या वेळेत फोनचा वापर टाळा -
दुपारच्या कडक उन्हात गेम खेळणे किंवा व्हिडिओ पाहणे यामुळे तुमचा स्मार्टफोन अधिक गरम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, दिवसाच्या सर्वात उष्ण वेळेत फोनचा जास्त वापर टाळणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. जर स्मार्टफोन गरम होऊ लागला तर तो काही काळासाठी वापरणे थांबवा.
हेही वाचा - Blue Origin NS-31: गायिका कॅटी पेरीसह विविध क्षेत्रातील 'या' 6 प्रसिद्ध महिला आज अंतराळात जाणार
स्मार्टफोनचे कव्हर काढा -
बऱ्याचदा जाड किंवा रबरी कव्हरमुळे स्मार्टफोन जास्त गरम होतो. जर तुमचा फोन गरम होत असेल तर त्याचे कव्हर काढून टाका जेणेकरून तो थोडा थंड होण्यास मदत होईल. गरम झालेला फोन थंड आणि कडक पृष्ठभागावर ठेवा जेणेकरून उष्णता लवकर बाहेर पडू शकेल.
अनावश्यक फिचर्स बंद करा -
ब्लूटूथ, वाय-फाय, मोबाइल डेटा आणि लोकेशन सर्व्हिसेस यासारख्या वैशिष्ट्यांमुळे तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी जलद संपते आणि डिव्हाइस देखील गरम होते. अशा परिस्थितीत, जर ही फिचर्स वापरत नसताल तर ती ताबडतोब बंद करा. जितके कमी फीचर्स सक्रिय असतील तितका फोन कमी गरम होईल. याशिवाय, जर कनेक्टिव्हिटीची आवश्यकता नसेल तर फ्लाइट मोड चालू करणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. यामुळे बॅटरी तर वाचेलच पण तुमचा फोन थंडही राहील.
हेही वाचा - WhatsApp वर फोटो पाठवून Scammer घालत आहेत लाखो रुपयांचा गंडा; फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
बॅकग्राउंड अॅप्स बंद करा -
उन्हाळ्यात तुमचा स्मार्टफोन थंड ठेवण्यासाठी, बॅकग्राउंडमध्ये चालू असलेले अनावश्यक अॅप्स बंद करणे महत्वाचे आहे. एकाच वेळी अनेक अॅप्स उघडल्याने प्रोसेसरवर अतिरिक्त दबाव येतो. अशा परिस्थितीत, तुम्ही वापरत नसलेले अॅप्स स्वाइप करा आणि बंद करा. यासोबतच, वेळोवेळी फोन रीस्टार्ट करणे देखील फायदेशीर आहे. यामुळे फोन थंड राहतोच पण बॅटरी लाइफही सुधारते.