World First Gold and Silver Pendant ATM
Edited Image
World First Gold and Silver Pendant ATM: आतापर्यंत तुम्ही एटीएममधून फक्त पैसे काढले असतील पण लवकरच तुम्ही एटीएममधून सोने आणि चांदीचे पेंडेंट देखील काढू शकाल. भारतातील आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यात असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानम तिरुमला मंदिरात जगातील पहिले सोने आणि चांदीचे पेंडंट एटीएम सुरू होत आहे. या एटीएम मशीनमधून तुम्ही भगवान वेंकटेश्वर आणि देवी लक्ष्मी देवीच्या प्रतिमा असलेले पेंडेंट खरेदी करू शकता.
हेही वाचा - काय सांगता!! आता फक्त विचार केल्यानंतर मजकूर आपोआप टाइप होणार? Meta चे Brain Typing AI तंत्रज्ञानाचा करणार चमत्कार!
एटीएममध्ये वापरण्यात येणार खास सॉफ्टवेअर -
तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या कार्यकारी अधिकारी जे श्यामला राव यांनी अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या एटीएम मशीनचे सॉफ्टवेअर अशा प्रकारे डिझाइन केले आहे की, कोणत्याही व्यक्तीला हे एटीएम चालवता येईल. लोक यातून सोने आणि चांदीचे पेंडेंट मिळू शकतील.
हेही वाचा - Chandrayaan-3 Mission: चांद्रयान-3 मोहिमेमुळे उलगडले चंद्राचे खोलवरचे रहस्य! अनेक भागांवर असू शकतो बर्फ
एटीएममधून मिळणार 2 ग्रॅम, 5 ग्रॅम आणि 10 ग्रॅम वजनाचे पेंडंट -
दरम्यान, जे श्यामला राव यांनी सांगितले की, पवित्र धर्मग्रंथ आणि आगमांसह मंदिराच्या परंपरांचे पालन केले तरच हा प्रकल्प पुढे जाईल. जे. श्यामला राव यांच्या पुढाकाराने, तिरुमला मंदिर, तिरुपतीतील गोविंदराज मंदिर आणि तिरुचानूरमधील पद्मावती अम्मावरी मंदिरात डिजिटल परिवर्तनाचे काम केले जात आहे. या एटीएममधून 2 ग्रॅम, 5 ग्रॅम आणि 10 ग्रॅम वजनाच्या प्रकारांमध्ये सोने आणि चांदीचे पेंडंट एटीएम मिळेल.