Sat. Oct 16th, 2021

मुरूडच्या किनाऱ्यावर पॅरासेलिंग करताना दोर तुटून मुलाचा मृत्यू!

अनेक पर्यटनस्थळांवर समुद्र किनारी water sports आणि adventure sports ला पर्यटकांची पसंती असते. मात्र हे खेळ खेळताना सावधान. या जीवावर बेतू शकणाऱ्या खेळांच्या बाबतीत आवश्यक ती सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आली आहे की नाही, हे पाहणं आवश्यक असतं. मुरुड समुद्रकिनारी पॅरासेलिंग करत असतना दोरी तुटून 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वेदांत पवार असं या मुलाचं नाव आहे. या दुर्घटनेत मुलाचे वडील गणेश पवार हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.

 

कशी घडली दुर्घटना?

पुण्याचे रहिवासी असणारे गणेश पवार हे कुटुंबासह अलिबाग येथे पर्यटनासाठी आले होते.

मुरूड समुद्र किनाऱ्यावर सुट्टीचा आनंद लुटत असताना त्यांचा मुलगा वेदांतसोबत ते पॅरासेलिंगसाठी गेले.

मात्र पॅराशूट उंचावर गेल्यावर अचानक या पॅराशूटचे दोर तुटले आणि वडील आणि मुलगा दोघंही उंचावरून खाली कोसळले.

या दुर्घटनेत मुलगा वेदांत याचा जागीच मृत्यू झाला.

गणेश पवार हेदेखील गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर सध्या मुरूड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुलाच्या मृत्यूने सुट्टीचे आनंददायी क्षण उपभोगायला गेलेल्या पवार कुटुंबावर मात्र शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *