Tue. Sep 28th, 2021

तेज बहादूर यादव यांची निवडणूक आयोगाने उमेदवारी केली रद्द

वाराणसी लोकसभा मतदारसंघातून सपा-बसपाचे उमेदवार तेज बहादूर यांची उमेदवारी निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सपा-बसपाने तेज बहादूर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले होते. मात्र त्यांची उमेदवारी रद्द केल्यामुळे सपा-बसपाला मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तेज बहादूर यांची उमेदवारी का रद्द केली ?

तेज बहादूर हे सीमा सुरक्षा दलात होते.

भारतीय सैन्याला निकृष्ट दर्जाच्या आहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता.

त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

यामुळे तेज बहादूर यांना बीएसएफमधून बडतर्फ करण्यात आले होते.

केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेतून निलंबित केलेला व्यक्ती निवडणूक लढवण्यात इच्छूक असेल तर त्याला प्रमाण पत्र सादर करावे लागते.

भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणामुळे सेवेतून निलंबित केले नसल्याचे कारण सादर करावे लागते, अशी माहिती वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

मात्र तेज बहादूर यांनी प्रमाण पत्र  दिलेल्या तारखापर्यंत सादर करू शकले नाही म्हणून रद्द केल्याचे समजते आहे.

त्यांची उमेदवारी रद्द केल्यामुळे सपा- बसपाला मोठा धक्का बसला आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *