डीआरडीओने केलं कमालीचं काम….

इंडियन एअर फोर्सला १२३ ‘तेजस’ फायटर जेट मिळणार आहे. रडार पुढच्या काही काळात इंडियन एअर फोर्समध्ये १२३ ‘तेजस’ फायटर विमानांचा समावेश करण्यात येणार आहे. ‘तेजस’मधील इस्रायली रडारच्या जागी, ही ‘उत्तम’ रडार यंत्रणा बसवण्यात येईल. त्यातील ५१ टक्के ‘तेजस’मध्ये स्वदेशी बनावटीची ‘उत्तम’ रडार यंत्रणा असेल स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला बळकटी देणारी एक चांगली बातमी आहे. पहिल्या ४० तेजसमध्ये इस्रायली बनावटीचे रडार आहेत तर, ८३ तेजस मार्क-१ए AESA रडार यंत्रणा असेल.
डीआरडीओचे अध्यक्ष सतीश रेड्डी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले. की, ८३ पैकी ६३ तेजस विमानात उत्तम रडार यंत्रणा आहे. शिवाय “तेजस मार्क-१ए मध्ये उत्तम रडार यंत्रणा असणार आहे. आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये उत्तमने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. HAL बरोबर आम्ही सामंजस्य करार केला आहे. ”डीआरडीओने बंगळुरुमधील LRDE प्रयोगशाळेने हे रडार विकसित केलं आहे. तेजसच्या निर्मितीमध्ये ६२ ते ६५ टक्के स्वदेशी घटक वापरण्याचा HAL चा प्रयत्न केला आहे. उत्तम रडारमध्ये एकाचवेळी वेगवेगळया लक्ष्यांना शोधण्याची तसेच उच्चप्रतीचे फोटो काढण्याची क्षमता आहे.
मोदी सरकार संरक्षण क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञान निर्मितीवर जास्त भर देत आहे.