Mon. Jan 17th, 2022

“कामाख्या” च्या रुपातील तेजस्विनी

या नवरात्रीच्या दुसऱ्याच दिवशी तिने “कामाख्या” च्या रुपातील फोटो पोस्ट करुन महत्त्वपूर्ण प्रश्न मांडला आहे.

तेजस्विनी पंडीत  गेल्या दोन वर्षापासून नवरात्रोस्तवात वेगवेगळ्या संकल्पनांच्या माध्यमातून नारीशक्तीचा आविष्कार घडवत असते.  या वर्षी सुद्धा तिने जगभरातील काही महत्त्वाच्या प्रश्नांवर ती भाष्य करणार आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या देवींच्या रुपातून ती या समस्यांवर व्यक्त होणार आहे. नऊ दिवस तेजस्विनी पंडीत तिच्या या वेगवेगळ्या कलाकृतीतून आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत असते. या नवरात्रीच्या दुसऱ्याच दिवशी तिने “कामाख्या” च्या रुपातील फोटो पोस्ट करुन महत्त्वपूर्ण प्रश्न मांडला आहे.

”वेद , पुराण आणि संस्कृतीचा आपला देश प्रत्येक नव्या जीवाची निर्मिती होते. योनी मधून आणि म्हणूनच माझ्या या रूपात माझ्या योनीची पूजा होते. वेद सांगतात स्त्री प्रमाणे नदीही रजस्व संस्कारा नंतर जीवनाची (पाण्याची) नवनिर्मिती करते तेव्हा त्या काळात तिला स्पर्श करणं टाळावे. जिथे नदीला देखील अशाप्रमाणे सन्मान देण्याची रीत आहे.  तिथेच प्रत्येक वर्षी ३०,००० हून अधिक शिलांचं हनन होतंय, ज्या योनीची पूजा व्हावी तिच्यावर निर्घृण वार केले जातात हे कसं सहन करू मी ? दुधाचे दात देखील न आलेल्या माझ्या लेकी वासनेला बळी पडतात तेव्हा त्यासाठी कुणाला जबाबदार ठरवू मी?” या रुपाचं महत्त्व सांगत तिने असे लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

द्वितीय ” कामाख्या ” . . वेद , पुराण आणि संस्कृतीचा आपला देश… प्रत्येक नव्या जीवाची निर्मिती होते योनी मधून आणि म्हणूनच माझ्या या रूपात माझ्या योनीची पूजा होते. वेद सांगतात स्त्री प्रमाणे नदीही रजस्व संस्कारा नंतर जीवनाची (पाण्याची ) नवनिर्मिती करते तेंव्हा त्या काळात तिला स्पर्श करणं टाळावे. जिथे नदीला देखील अश्या प्रमाणे सन्मान देण्याची रीत आहे तिथेच प्रत्येक वर्षी ३०,००० हून अधिक शीलांचं हनन होतंय, ज्या योनीची पूजा व्हावी तिच्यावर निर्घृण वार केले जातात हे कसं सहन करू मी ? दुधाचे दात देखील न आलेल्या माझ्या लेकी वासनेला बळी पडतात तेंव्हा त्यासाठी कुणाला जवाबदार ठरवू मी ? . . Concept & Director : @dhairya_insta_ Photographer : @bharatpawarphotography Digital art by : @amol.hirawadekar @imvishalshinde @thenameisabhishekk Asst. Dir : @shraddha_kakade Jewellery by : @pngadgilandsons Makeup : @vinodsarode Hair : @sheetalpalsande Styled by : @stylistnakshu @saniyacool @pottering.vels Costumes By : @official_dadfashionstudio PR & Social Media By : @dreamers_pr Special thanks: @rjadhishh #navratri #tejaswinipandit

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

मुंबईतील वाहतूककोडींची समस्या मांडताना ती मुंबादेवीच्या रुपाचा आधार घेणार आहे. तर या वर्षी वाघांची शिकार ही जास्त प्रमाणात झाली आहे. हे मांडताना ती माँ शेरावालीचं रुप दाखवणार आहे.

तसचं दहाव्या दिवशीच म्हणजेच दसऱ्या दिवशी आपल्यातल्या रावणाचं, म्हणजेच चुकीच्या सवयीचं दहन कसे करायचं या गोष्टीचा संदेश ती कलाकृतीमधून देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *