Tue. Dec 7th, 2021

‘सैराट’ची कहाणी प्रत्यक्षात…

सैराट चित्रपटातल्या कथेसारखी धक्कादायक घटना तेलंगणामध्ये घडली आहे.

झाले असे की दोघांनीही घरातल्यांच्या विरोधात जाऊन आंतरजातीय लग्न केलं आणि तेलंगणातील एका गावात गुण्यागोविंदानं राहत होते. आयुष्यात नवा पाहुणा येणारं म्हणून दोघंही आनंदात असताना मनाला धस्स करणारी घटना घडली.

प्रणय नावाच्या व्यक्तीनं एका नामांकीत बिल्डरची मुलगी अमृतासोबत प्रेमविवाह केला होता. आंतरजातीय प्रेमविवाहनंतर मुलीच्या वडिलांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या होत्या. गरदोर असलेल्या अमृतासमोर गँगस्टरकडून प्रणयवर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. अनुसूचित जातीतील प्रणयची आंतरजातीय विवाहातून हत्या करण्यात आली. या घटनेत प्रणयचा जागीच मृत्यू झाला.

आपल्या मुलीने दलित मुलासोबत आंतरजातीय विवाह केल्याने संतापलेल्या एका पित्याने गँगस्टरला १ कोटींची सुपारी देऊन जावयाची हत्या केली आहे. तसेच ५० लाख रुपयांची रक्कम आधीच दिली होती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *