Tue. Sep 17th, 2019

आणखी 3 दिवस राज्याला उन्हाचा तडाखा

0Shares

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

संपूर्ण राज्य सध्या कडाक्याच्या उन्हात होरपळून निघालं आहे. पुढचे काही दिवस हीच परिस्थिती कायम राहणार असून विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली आहे. 

 

पुढचे 3 दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. त्यामुळे आणखी 3 दिवस तरी राज्यात उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे. 

 

कमाल तापमान सरासरीपेक्षा 5 अंश अथवा त्याहून अधिक असल्यास त्या ठिकाणी उष्णतेची लाट आहे, असं मानलं जातं.  

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *