Wed. Jun 29th, 2022

दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परिक्षांच्या वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ दरम्यान होणार आहे तर बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ दरम्यान होणार आहे. यासंबंधी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

दहावी, बारावी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. ‘सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर वेळापत्रक तयार केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोरोना महामारीमुळे २५ टक्के अभ्यास याआधीच कपात करण्यात आला आहे. उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील, असे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

परिक्षांचे वेळापत्रक

४ मार्च २०२२ ते ७ एप्रिल २०२२ या दरम्यान बारावीची लेखी परीक्षा होणार आहे. तर १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ यादरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे. दोन्ही परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावरच म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत.

1 thought on “दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

  1. You need to get upset! Really its a must to take a look past everything and get upset. Generally this will allow you to take the inititive to make things happen.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.