Thu. May 19th, 2022

शुक्रवारी दिवसभरात ६१ एसटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती

एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण्याचा मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी राज्यसरकारकडून आवाहन करण्यात येत आहे. तसेच राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र कामावर रूजू न झाल्यास मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. तरीही विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरूच आहे.

विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. कामावर रुजू न झाल्यास राज्य सरकार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीची कारवाई करत आहेत. शुक्रवारी दिवसभरात ६१ एसटी कर्मचाऱ्यांची सेवा सेमाप्ती करण्यात आली. तसेच १६१ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण ९३८४ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे तर १९८० कर्मचाऱ्यांवर सेवा सामप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

औरंगाबादमध्येही एसटी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे. औरंगाबादच्या मध्यवर्ती एसटी आगारात आजही शुकशुकाट पाहायला मिळाला. तसेच शुक्रवारी एकूण ४५० एसटी कर्मचारीपैकी केवळ ४६ कर्मचारी कामावर हजर झाले.

एसटी महामंडळ अत्यावश्यक सेवेत आहे की नाही याबाबत सरकारने वेगवेगळी भूमिका मांडल्याने एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्याचे पुण्यातील एसटी संपकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. विलिनीकरणावर ठाम असलेले पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील कर्मचारी अद्यापही आंदोलन करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.