Sun. May 9th, 2021

फ्रान्समधील नीस शहरामध्ये दहशतवादी हल्ला

भारताच्या परराष्ट्र विभागाने दहशतवादी घटनांविरोधातील लढ्यांमध्ये फ्रान्ससोबत असल्याचे जाहीर…

फ्रान्समधील नीस शहरामध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. हा हल्ला नोट्रे डेम चर्चबाहेर झाला आहे. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण ह्यात जखमी झाले आहेत अशी माहिती नीस शहराचे ,महापौर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.


हा हल्ला मोहम्मद पैगंबरांच्या कार्टूनवरुन झालेल्या वादातून सुरु झाला होता. या हल्ल्यासंबधित माहिती देताना नीसच्या महापौरांनी सांगितले,हल्लेखोराला ताब्यात घेत असताना देखील तो “अल्ला हू अकबर” अशा घोषणा देत होता. पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केल्यानंतरही तो जिवंत असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.
तसेच फ्रान्सच्या दहशतवाद विरोधी संस्थेने या हल्ल्याचा तपास सुरु केला आहे. भारताच्या परराष्ट्र विभागाने यापूर्वीच दहशतवादी घटनांविरोधातील लढ्यांमध्ये फ्रान्ससोबत असल्याचे जाहीर केले आहे. हल्लेखोर ही व्यक्ती ट्युनिशियाचा नागरिक असून हल्लेखोराने हातात कुराण धरले होते. यापुर्वी देखील फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *