#PulwamaTerrorAttack : ‘या’ दहशतवाद्यामुळे 44 जवान शहीद

जम्मू- काश्मीरमध्ये गुरुवारी पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या एका तुकडीवर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात 39 जवान शहीद झाले. दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. हा हल्ला श्रीनगर- जम्मू राष्ट्रीय महामार्गजवळच्या अवंतीपुरा भागातील गोरीपुरा येथे झाला. तसेच जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं हा हल्ला केल्याचे म्हटलं आहे. भारतात तीन वर्षातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे माहिती समोर आली आहे.

जैश- ए- अहमद या संघटनेने एक व्हिडीओही व्हायरल केला आहे. या व्हिडीओमध्ये एक दहशतवादी बोलताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या दहशतवादीनेच हा हल्ला केल्याचे समजते आहे. आदिल अहमद दार असे या दहशतवाद्याचे नाव आहे.

आदिल अहमद दार कोण ?

आदिल अहमद दार याचे वय 20 वर्ष.

गेल्या मार्च महिन्यापर्यंत हा पुलावामा जिल्ह्यातील एका गावाच्या वखारीत काम करत होता.

12वीचे शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबीयांना न सांगता घरातून निघून गेला.

त्याचा मित्र समीर अहमद सुद्धा घर सोडून निघून गेला.

आदिल घरी परतला नाही म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली.

काही दिवसांनी आदिलचा सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला होता. त्याने जैश-ए-मोहम्मद संघटनेचा दहशतवादी असल्याचे म्हटले होते.

आदिलचा चुलत भाऊ सुद्धा दहशतवादी होता. मात्र आदिल संघटनेत सहभागी होण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे आदिलच्या कुटुंबीयांनी सांगितले.

आदिल बुहरान वानीच्या मृत्यूनंतर झालेल्या आंदोलनात सहभागी झाला होता.

यावेळी भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात त्याच्या पायाला गोळीही लागली होती.

आदिलला हल्ल्यापूर्वी 6 महिने प्रशिक्षण दिले गेले होते.

त्यानंतर गुरुवारी आदिलने सीआरपीएफच्या तुकडीवर भीषण हल्ला केला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Exit mobile version