Tue. Sep 27th, 2022

नवी मुंबईतील मोठमोठे प्रकल्प दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर?

नवी मुंबईतील उरण जवळील मोठमोठे प्रकल्प दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे उघडकीस आले आहे. उरण जवळील खोपटा पुलावर त्या संबंधित मजकूर आढळल्याने खळबळ उडाली आहे. या मजकूरामध्ये इसिस, दहशतवादी अबू बकर अल बागदादी, हाफिज सईद, रहीम कटोरी आणि राम कटोरी यांचा उल्लेख असून , धोनी, केजरीवाल यांची नावे सांकेतिक स्वरूपात वापरण्यात आली आहेत. तसेच जेएनपीटी, एअरपोर्ट आणि गॅस पेट्रोलच्या प्रकल्पाचे नकाशे काढून त्यावर मजकूर लिहिला आहे.तर दुसऱ्या एका आकृतीत कुर्ला गोरखपूर असा उल्लेख करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी हे दहशतवादी मजकूर लिहिले आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आढळून आल्यात.

नेमकं काय घडलं ?

नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक घडना उघडकीस आली आहे.नवी मुंबईतील उरण जवळील काही प्रकल्प हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे उघडकीस आले आहे.

उरण जवळील खोपटा पुलावर त्यासंबंधित मजकूर आढळले आहेत.या मजकूरा संबंधित माहिती पोलिसांना मच्छीमारांनी दिली आहे.

या मजकुरामध्ये इसिस, दहशतवादी अबू बकर अल बगदादी, हाफिज सईद, रहीम कटोरी आणि राम कटोरी यांचा उल्लेख केला आहे.

याशिवाय धोनी, केजरीवाल यांची नावेही यात सांकेतिक स्वरूपात वापरण्यात आली आहेत.जेएनपीटी, एअरपोर्ट आणि गॅस पेट्रोलच्या प्रकल्पाचे नकाशे काढून त्यावर मजकूर लिहिला आहे.

तर दुसऱ्या एका आकृतीमध्ये कुर्ला गोरखपूर असा उल्लेख केला आहे.ज्या ठिकाणी हे मजकूर लिहिण्यात आले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत.

ही घटना समजताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून पुलाच्या पिलरवर संदेश लिहिणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.या आकृत्यांमध्ये आढळलेला मजकूर बघता त्यात काही जवळच्या  ठिकाणांचा उल्लेख आहे.

त्यामुळेच पोलिस संरक्षण यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.आता या तपासामधून काय अर्थ लागतोय हे बघणे महत्त्वाचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.