Fri. Jan 28th, 2022

भारतात समुद्र मार्गे दहशतवादी हल्ल्याची शक्यता- नौदल प्रमुख

भारतात समुद्र मार्गे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी दिली. तसेच भारताला अस्थिर करणार देश दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. दहशतवादी समुद्र मार्गाने देशात घुसण्यासाठी प्रशिक्षण घेत असल्याची माहिती नौदल प्रमुख सुनील लांबा यांना मिळाली असल्याचे ते म्हणाले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले नौदल प्रमुख ?

संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि राजनैतिक अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात नौदल प्रमुख लांबा यांनी हे वक्तव्य केलं आहे.

भारताला अस्थिर करणारे देश दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहेत.

तसेच दहशतवादी समुद्र मार्गाने देशात घुसून हल्ला करण्यासाठी प्रशिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच जगातील काही मोजकेच देश अशा दहशतवादापासून बचाव करू शकली आहे.

दहशतवादी ही समस्या जगात वाढत आहे.

दहशतवाद वाढत असल्यामुळे धोका वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *