Sun. Apr 21st, 2019

काश्मीरमध्ये किश्तवाड येथे रुग्णालयात गोळीबार

30Shares

पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे हल्ले सुरूच आहेत.आज जम्मू-कश्मीरमधील किश्तवाड येथे दहशतवाद्यांनी रुग्णालयात गोळीबार केला असून या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहे.सुरक्षा दलाने रुग्णालयास चारही बाजूने घेरले आहे.या गोळीबारात वैद्यकीय सहाय्यक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नेमक काय घडलं?

पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले सुरूचं आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये किश्तवाड येथे दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे.

एका रुग्णालयात हा गोळीबार करण्यात आला आहे.

यामध्ये रुग्णालयातील वैद्यकीय सहाय्यकांसह एक जण जखमी झाला आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी या परिसराला घेराव घातला असून हल्लेखोर आत आहे असं सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *