Sat. Oct 16th, 2021

काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची कारवाई, शस्त्रसाठ्यासहित तीन दहशातवादी ताब्यात

जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर त्याठिकाणी चांगल्याच दहशतवादी कारवाया सुरू आहेत. परंतु हल्ल्याच्या तयारीत असणाऱ्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने चांगलाच धडा शिकवला आहे.

जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर त्याठिकाणी चांगल्याच दहशतवादी कारवाया सुरू आहेत. परंतु हल्ल्याच्या तयारीत असणाऱ्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने चांगलाच धडा शिकवला आहे. यामध्ये तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने अटक केली आहे. यावेळी त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यात आलं त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरूच आहेत. परंतु भारतीय सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा कट उधळून लावला आहे. कठूआ जवळील हायवेर सुरक्षा दलाची नाकाबंदी होती. यामध्ये एका ट्रकमधून तब्बल 6 ए.के. 47 रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत. तर तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आलं आहे.

ही सुरक्षा दलाकडून झालेली काश्मीरमधील मोठी कारवाई मानली जात आहे. गेल्या काही दिवसापासून जम्मू काश्मीमध्ये मोठा पोलीस बंदोबंस्त तैनात करण्यात आला आहे. त्यातूनचं ही मोठी कारवाई करण्यात आली. यात अटक झालेल्या तिघांची चौकशी करण्यात येणार आहे. यात महत्वाची माहिती मिळेल अस बोलण्यात येत आहे.

या महामार्गावर एका ट्रकमधून शस्त्रांचा साठा येत असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा दलाचे मोठे यश असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *