Wed. Jun 3rd, 2020

देशभक्तांचा उल्लेख ‘दहशतवादी’!,B.A.च्या पुस्तकात क्रांतिकारकांचा अपमान…

देशभक्त क्रांतिकारकांना चक्क ‘दहशतवादी’ संबोधण्याचा संतापजनक प्रकार विद्यापीठाच्या पुस्तकात घडला आहे. अमरावती  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या B.A. द्वितीय वर्षाच्या इतिहासाच्या पुस्तकात घटक क्रमांक 4 मध्ये सशस्त्र क्रांतीवीरांच्या चळवळीला दहशतवाद्यांची चळवळ असं म्हणण्यात आलंय. हा प्रकार क्रांतिकारकांचा अवमान करणारा असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) केला आहे. तसंच याप्रकरणी दोषींना कठोर कारवाईची मागणी केली आहे.

कोण बदलतंय इतिहास?

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांची महत्त्वाची भूमिका होती.

हे सर्वश्रूत असताना मुक्त विद्यापीठाने B.A. द्वितीय वर्षाच्या इतिहासाच्या पुस्तकात क्रांतिकारकांचा अपमान केला.

विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

यात चळवळीचा उगम, वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य, कुका आंदोलन, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे क्रांतिकार्य, बंगाल आणि इतर प्रांतातील क्रांतिकार्य, भारताबाहेरील चळवळ आणि क्रांतिकारकांच्या चळवळीचे अपयश या विषयांचं विवेचन आहे.

 

कशी घडली ही चूक?

मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम तयार करताना स्वतंत्र मंडळ असते.

त्यामुळे ही गंभीर चूक अभ्यास मंडळाच्या लक्षात येऊ नये, हे आश्चर्य असल्याचं ABVPने म्हटलं आहे.

पुस्तकातील चूक त्वरेने दुरूस्त करावी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी.

अन्यथा राज्यभरात आंदोलन केले जाईल, असा इशारा ABVPच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

ही चूक अनावधानाने?

इतिहासाच्या पुस्तकात देशभक्त क्रांतिकारकांच्या चळवळीचा ‘दहशतवादी क्रांतिकारकांची चळवळ’ असा अनावधानाने उल्लेख झाला आहे.

ही बाब नाशिक मुख्यालयात कळवण्यात आली आहे.

पुढच्या वर्षी यात नक्कीच सुधारणा होईल.

शिवाय आपण वरिष्ठ स्तरावर हे निवेदन पाठविले असून त्यांना अद्याप उत्तर मिळाले नाही.

मात्र लवकरच मिळेल, अशी अपेक्षा देखील अंबादास मोहिते यांनी व्यक्त केली आहे.

क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे भारत स्वतंत्र झाले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांचा इतिहास आजच्या पिढीला माहित असणे गरजेचे आहे. मात्र, क्रांतिकारकांचा इतिहास सांगताना चूक केली जाते. ‘देशभक्त’ ऐवजी ‘दहशतवादी’ असा उल्लेख करुन क्रांतिकारकांचा अपमान तर केला जातोच, मात्र ही बाब कोणाच्याच निदर्शनास येत नाही ही लाजिरवाणी  बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *