Wed. Dec 8th, 2021

सुरक्षादलांनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

काश्मीर: पुलवामामध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. बुधवार आणि गुरुवारी रात्री पुलवामाच्या पुचल भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत. त्याचवेळी पुलवामामध्येच झालेल्या आणखी एका चकमकीत आणखी ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे.

कुलगाम पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये कुलगामच्या जोदर भागात लष्कर-ए-तोयबाचे २ दहशतवादी ठार झाले आहेत. चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शरण येण्याच्या अनेक संधी दिल्या, परंतु दहशतवाद्यांकडून सातत्याने गोळीबार सुरूच ठेवला गेला आणि सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिले.

बुरहान वानी मारला गेल्याला ५ वर्षे पूर्ण होत असताना दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न उधळला. सुरक्षादलाने या परिसराला घेराव घातला असून या भागात इतर दहशतवादी लपले असण्याची शक्यता असल्याने शोध मोहीम राबविली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *