Wed. Oct 5th, 2022

टीईटी परीक्षा घोटाळा : बनावट प्रमाणपत्र देऊन केले उत्तीर्ण

शिक्षक पात्रता परिक्षेत (टीईटी) राज्य परीक्षआ परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी इतरांशी संगनमत करून निकाल लागल्यानंतर अनेकांना बनावट प्रमाणपत्रे देऊन त्यांना पास केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

सायबर पोलिसांना कारवाई दरम्यान, २०१९-२०ची ४०० बनावट प्रमाणपत्रे तर २०१८च्या परिक्षेत उत्तीर्ण दाखवलेली २५० अशी एकूण ६५० प्रमाणपत्र पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले की, ‘टीईटी परीक्षेत आरोपींनी परीक्षेचा निकाल लावल्यानंतर अनेक अपात्र उमेदवारांना बनावट प्रमाणपत्रे देण्यात आली. तसेच टीईटी परीक्षएत तुकाराम सुपे, डॉ. प्रीतीश देशमुख, अश्विनकुमार यांनी एजंटना हाताशी धरून अनेक अपात्र उमेदवाराकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांना पात्र करून घेण्यात आले.’

दरम्यान, याप्रकरणी देशभरातील परीक्षा गैरव्यवहारांचा संबंध समोर येत आहे. सायबर पोलिसांनी आरोग्य भरती, म्हाडा, शिक्षक पात्रता परीक्षामध्ये अटक करण्यात आलेले अनेक आरोपी हे देशातील विविध परीक्षा गैरव्यवहारांशी संबंधित असल्याचे सांगितले आहे.

youtube.com/watch?v=goyi10mw-xk

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.