Tue. May 17th, 2022

ठाकरेंचं लक्ष देवेंद्र फडणवीस

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसी मैदानात जाहीर सभा घेतली. या सभेदरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले तसेच विरोधकांवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी भाषणातील ९० टक्के विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबाबत केवळ ५ टक्के वेळ खर्ची केला. बाबरी मशिदीच्या प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस तुम्ही जर तिथे गेला असता तर तुमच्या फक्त वजनाने बाबरी खाली आली असती, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘बाबरी तुम्ही पाडली नाही. बाबरी आमच्या शिवसैनिकांनी पाडली. हे आम्ही अभिमानाने सांगतो. तुम्ही म्हणता बाबरी आम्ही पाडली, फडणवीस बाबरीच्या सहलीला गेले होते का? की चला चला बाबरी पाडायला चला’, असा घणाघातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर केला आहे.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले, ‘मला अजूनही तो दिवस आठवत आहे, की बाबरी पाडल्याची बातमी पाहताच मी बाळासाहेबांकडे पळत गेलो आणि त्यांना बाबरी पाडल्याची बातमी दिली. त्यानंतर त्यांना फोन आला. फोनवर बोलताना ते म्हणाले, बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला शिवसैनिकांचा अभिमान आहे.’ असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.