Fri. Nov 15th, 2019

‘ठक ठक’ गँगचा धूमाकूळ, ‘या’ Celebrityच्या पत्नीलाही लूटलं!

‘ठक ठक’ या नावाच्या कॉमिक्सने एकेकाळी लहान मुलांना खूप हसवलं होतं. मात्र याच नावाची एक गँग आता दिल्लीमध्ये दहशत पसरवत आहे. दिल्ली शहरात गुन्ह्याचे प्रमाण वाढलं आहे. ‘ठक ठक gang’ लोकांना सर्रास लुबाडत आहे. केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर सेलेब्रिटीसुद्धा यांच्या जाळ्यात अडकत आहेत. माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांची पत्नी फरहीन प्रभाकरला हिला देखील ‘ठक ठक गँग’ने भर रस्त्यात लूटलंय. या प्रकरणी त्यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. वर्दळीच्या ठिकाणी लूट होत असताना कोणीही मदतीला न आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

फरहीन प्रभाकर यांच्या सामानाची ‘ठक ठक गँग’ने चोरी केली आहे. घटनेत त्यांचा मोबाईल आणि पाकिट चोरीला गेले आहे.

काय घडला नेमका प्रकार?

फरहीन आपल्या गाडीतून जात असताना त्यांच्या गाडीची काच ठोठावण्यात आलं.

त्यांच्या गाडीने कोणाला धडक दिली असेल या विचारातून त्यांनी काच खाली केली.

तेव्हा त्यांच्या डोक्यावर वार करण्यात आले.

त्यांचा मोबाईल आणि पाकिट चोरी करुन गुन्हेगार फरार झाले.

अस्थमाचा त्रास असलेल्या फरहान यांनी चोरांचा पाठलाग केला.

मात्र तब्येत बिघडल्यामुळे त्यांना अर्ध्या रस्त्यात चक्कर आली.

चोरी झालेल्या पाकिटात 16,000 रुपये रोख, मोबाईल आणि महत्वाची कागदपत्रं होतं.

हे ही वाचा- समलिंगी संबंधांतून झाली दिल्लीतील ‘या’ नेत्याची हत्या!

‘ठक ठक gang’च्या चोरीचा फंडा

गाडीच्या काचेवर knock केलं जातं.

काच उघडल्यावर ते भांडायला सुरुवात करतात.

गाडी चालकाला भांडणात गुंतवतात.

तोवर दुसरे साथीदार गाडीतील मौल्यवान सामान चोरी करतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *