कोरोनावर मात करत १०२ वर्षांच्या आजींनी दिला कानमंत्र

राज्यात सध्या सर्वत्र कोरोना वैश्विक महामारीमुळे अनेकांचे बळी जात आहेत. त्यामुळे सर्वत्र भीतीच वातावरण पाहायला मिळत आहे. पण कोरोनाला घाबरलात तर कोणत्याही उपचारांचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. त्यामुळे कोरोनाला घाबरू नका, कोरोनाशी दोन हात करा तुम्ही कोरोनावर नक्की मात कराल आणि बरे व्हाल, असा संदेश चक्क १०२ वर्षांच्या आजींनी दिला आहे.

ठाण्यातील होरायझन प्राईम या रुग्णालयात गेल्या पंधरा दिवस उपचार घेऊन सुशीला पाठक नावाच्या १०२ वर्षांच्या आजींनी कोरोनावर मात केली आहे. गेले पंधरा दिवस मुंबईतील अंधेरी येथे राहणाऱ्या श्रीमती सुशीला पाठक या आजींवर ठाण्यातील होरायझन प्राईम या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. कोरोनाची लागण झाल्यामुळे आजींचे नेमके पुढे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता.

पंधरा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर होरायझन प्राईमया कोविड सेंटरमधील डॉक्टरांनी आजींना कोरोनापासून मुक्त केलं. उपचारादरम्यान आजी डॉक्टर सांगत असलेल्या सर्व गोष्टी करत असल्याने तसेच आपल्याला कोरोनाची भीती न बाळगता सकारात्मकतेने उपचारांना प्रतिसाद दिल्याने आजींनी कोरोनावर मात करून घरी सुखरूप परतल्या आहेत. आजींची इच्छाशक्ती आणि आजींचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे आजीवर सर्व उपचार लागू पडत होते आणि आजींनी एक प्रकारे आम्हाला देखील सकारात्मकतेचा धडा दिला आहे असं मत रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version