Mon. Dec 6th, 2021

ठाण्यातील पाच हजार इमारती धोकादायक

ठाणे: ठाणे शहरात नागरिकांवर एकीकडे कोरोनाचं संकट ओढावलेलं असताना ऐन पावसाळ्याच्या आधी आता धोकादायक इमारतींचे संकट देखील घोंगावत आहे. ठाणे शहरात तब्बल पाच हजार इमारती या धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये काहींची सुधारणा झाली असून काही इमारतींची परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे.

पावसाळा तोंडावर असतांना या इमारतींच्या दुरुस्तीचं काम जर केलं नाही तर भविष्यात या इमारती कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. धोकादायक असणाऱ्या एका इमारतीत जवळपास ४० ते ५० कुटुंबे राहत असून या सर्व कुटुंबांवर भीतीचे सावट आहे. ठाण्यातील प्रामुख्याने तीन ठिकाणी क्लस्टर योजना होणार असल्याचे सांगितले गेले आणि गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कल्स्टर योजनेचा नारळ देखील फोडला गेला. परंतु आजतागायत या योजनेसाठी प्रशासन कार्यशील होत असताना दिसत नाहीये.

‘पावसाळ्यादरम्यान अनेकदा जुन्या इमारती पडण्याच्या घटना घडत असतात त्यानंतरच प्रशासन जागे होते, धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे दुःख व वेदना तसेच भीती अधिकार्‍यांना कळणार नाही’, अशा भावना सामाजिक कार्यकर्ते आणि इमारतीत राहणाऱ्या नागरीकांनी व्यक्त केल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *