Tue. Dec 7th, 2021

ठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू

ठाणे: ठाण्यात पुन्हा एकदा चोरट्यांमुळे एका महिलेला आपला प्राण गमवावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी कळवा रेल्वे स्थानकाजवळ एका मोबाईल चोरट्यासोबत झालेल्या झटापटीत एका महिलेचा लोकलखाली पडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अशीच घटना रस्त्यावर घडली आहे.चोरट्यांसोबत झालेल्या झटापटीत ही महिला चालत्या रिक्षामधून खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला.

कन्मिला रायसिंग असं या मृत महिलेचं नाव असून ती २७ वर्षांची होती.त्या दोन्ही चोरट्यांना नौपाडा पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली आहे.अल्केश उर्फ परवेझ अन्सारी (२०) आणि सोहेल अन्सारी (१८) अशी आरोपींची नावे असून हे दोघेही भिवंडीतील राहणारे आहेत.

दोघेही सराईत मोबाईल चोरटे असून त्यांच्याविरोधात कोनगाव आणि नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.पोलिसांनी त्यांच्याकडून मृत तरुणीच्या मोबाईलसह इतर ३ मोबाईल,रोकड आणि एक दुचाकी हस्तगत केली असून ठाणे सत्र न्यायालयाने दोघांनाही ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे,अशी माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *