Wed. Jul 28th, 2021

कोरोना उपचारांनंतर घरी परतल्यावर ठाण्यातील व्यावसायिकाला लागली पाच कोटींची लॉटरी

ठाणे : कोरोना संकटाच्या या आर्थिकदृष्ट्या खिळखिळ्या करून टाकणाऱ्या संकटामध्ये, महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील दिवा भागात राहणाऱ्या एका घराला मात्र देवी लक्ष्मीचा जणू आशीर्वाद मिळाला आहे. श्री, राजकांत पाटील या व्यापारी आणि लघु व्यावसायिकाने डियर लॉटरीज बैसाखी बंपर 2021 ड्रॉ जिंकत तब्बल 5 कोटी रूपयांची रक्कम मिळवली आहे. प्रत्येक व्यक्ती आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो आणि त्यासाठी दिवसरात्र मेहनत देखील घेतो पण तरीही जे ध्येय आहे ते पूर्ण होत नाही. विशेषत: गेल्या वर्षभरापासून अनेकांच्या स्वप्नाचा अक्षरशः चुराडा झाला आहे, सगळीकडे नकारत्मकता पसरली आहे, हातात जे आहे ते देखील गमावण्याची भीती आणि येणाऱ्या भविष्याची चिंता यामुळे सर्वांच्याच मनात सतत धाकधूक सुरु आहे. अशा कठीण काळात डियर लॉटरी घेऊन आली आहे एक असा मार्ग ज्यामुळे लोकांच्या विश्वासाला पुन्हा उभारी मिळून त्यांच्या आयुष्यात सकारात्मकता निर्माण होईल आणि पुन्हा एकदा जोमाने ते आपल्या स्वप्नांसाठी झटू शकतील. कोरोना महामारीला सुरुवात झाल्याबरोबर, संपूर्ण जग हे ऑनलाईन शॉपिंगकडे वळले आणि जीवनावश्यक सर्व गोष्टी लोकांना घरपोच मिळू लागल्या, डियर लॉटरीने देखील घोषणा केली कि ते सुद्धा आपल्या ग्राहकांना घरपोच लॉटरी तिकिट्स पोहचवण्याची सेवा देऊन ही नवीन जीवनशैली अंगीकारतील. यामुळे ग्राहकांची संख्या वाढली आणि जबरदस्त कॅश प्राईजेस घरबसल्या, कोणत्याही त्रासाविना सहज जिंकण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध झाली. श्री. राजकांत पाटील, हे महाराष्ट्रातील मुंबईच्या ठाणे नजीक दिवा येथे आपली पत्नी, आई आणि दोन मुलांसमवेत राहतात, त्यांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. “मला स्वत:ला कोरोना विषाणूची लागण झाली होती आणि मी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होतो. पूर्णपणे यातून बरा झाल्यावर, जेव्हा मी घरी परतलो तेव्हा मला डियर लॉटरी कडून त्यांच्याशी संपर्क साधण्याविषयी एक मेसेज आला. काही कारणास्तव मी जरा गोंधळलो कारण मी कित्येक दिवस आजारी होतो आणि हा मेसेज नेमका कशा संदर्भात आहे ते मला कळत नव्हते. पण जेव्हा मी त्यांच्याशी संपर्क साधला, ते म्हणाले, ‘नमस्कार पाटील साहेब. तुम्ही डियर लॉटरी टीमच्या इतर 25 सदस्यांसह कॉन्फरन्स कॉल वर आहात आणि आम्ही तुमचे अभिनंदन करतो कारण तुम्ही 5 कोटी रुपये जिंकलेले आहात.’ त्यांनी असे म्हणताच काही क्षण मी गांगरलो आणि हे खरंच घडलं आहे याची जाणीव झाल्यावर आनंदाने तोंडातून शब्द फुटत नव्हते,” अशी प्रतिक्रिया डियर लॉटरीज बैसाखी बंपर 2021 चे मानकरी ठरलेल्या श्री. पाटील यांनी दिली. या लॉटरी तिकिटांची किंमत अवघ्या ६ रुपयांपासून सुरु होते.

समाजातील प्रत्येक व्यक्ती यामध्ये सहभागी व्हावा हाच या मागचा उदात्त हेतू आहे. सध्याच्या कठीण काळामध्ये, या महामारीला तोंड देताना, लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, पगार कमी झाले आहेत. अशा स्थितीत नवीन आशा बाळगणे आणि स्वत:ला धीर देणे कठीण होऊन बसले आहे. म्हणूनच डियर लॉटरी आपल्या मजेशीर स्पर्धांच्या माध्यमातून लोकांना नशिबावर विश्वास ठेवण्यास आणि आपलेही भविष्य कधीतरी बदलेल अशी आशा बाळगण्यास प्रोत्साहित करत आहे. “प्रत्येकजण मेहनत घेतो पण प्रत्येकालाच मेहनतीचे फळ मिळतेच असे नाही. कधी कधी, आपल्याला नशिबाला संधी द्यावी लागते.” असे श्री. पाटील म्हणाले. व्यवसाय वाढवण्यासाठी आणि अधिक चांगली कामे करण्यासाठी जिंकलेली रक्कम गुंतवण्याचा त्यांचा मानस आहे. “यातून आम्हालाही खूप आनंद आणि समाधान मिळते: एका वाक्यात सांगायचे झाले तर आम्ही लोकांना त्यांची स्वप्ने आणि इच्छा पूर्ण करण्यास मदत करतो. आम्हाला आशा आहे कि अशाच प्रकारे लोकांचे भविष्य आम्ही उज्ज्वल करत राहू.” असे व्यवस्थापकीय संचालक एम अँड सी, श्री. जोस चार्ल्स मार्टिन म्हणाले. डियर लॉटरी हे भारताच्या लॉटरी क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आहे. ज्याची उलाढाल 2 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी आहे. डियर लॉटरने डीलर्स, स्टॉकिस्ट आणि एजंट्सचे मोठे जाळे, लॉटरी कायदेशीर असणाऱ्या विविध राज्यांत तयार केले आहे. सतत नाविन्यतेचा ध्यास आणि लॉटरीजच्या क्षेत्रातील अविरत संशोधन यामुळे एक भक्कम स्थान डियर लॉटरीने मिळवले आहे. लॉटरी खेळणाऱ्या लाखो लोकांचा डियर लॉटरी वर असलेला विश्वास अद्भुत आहे. 2001 पासून डियर लॉटरी ही जागतिक लॉटरी असोसिएशनची (डब्ल्यूएलए) सदस्य आहे. 2009 मध्ये, डब्ल्यूएलए रीस्पोन्सीबल गेमिंग फ्रेमवर्कच्या लेव्हल 1 वर पोहोचून पात्रता सिद्ध केल्याबद्दल डब्ल्यूएलएने डियर लॉटरीला मान्यता बहाल केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *