राज्यातील रुग्णालयांमध्ये आगीचं सत्र सुरूच

ठाणे: राज्यात रुग्णालयांमधील अपघातांची मालिका सुरूच आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा कौसा येथील प्राइम क्रिटीकेअर या रुग्णालयाला लागली असून या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. भंडाऱ्यातील नवजात बालकांच्या कशाला आग, भांडुप येथील सनराईज रुग्णालयाला आग, नागपूर येथील वेल ट्रीट रुग्णालयाला आग, विरार येथील रुग्णालयाला आग लागण्याच्या घडलेल्या दुर्घटनांनंतर आता ठाणे जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे.

आज पहाटे पावणे चारच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

मीटर बॉक्समध्ये अचानक लागलेल्या आगीमुळे रुग्णालयाला देखील आग लागली. आगीची घटना घडली तेव्हा रुग्णालयात एकूण २० रुग्ण होते. यापैकी ६ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आग लागल्यानंतर २० रुग्णांना बाहेर काढण्यात यश आलं. त्यांना जवळच्या बिलाल रुग्णालय येथे हलवण्यात आले. त्यातील चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

मृतांची नावे-
यास्मिन सय्यद (वय ४६ वर्षे)
नवाब शेख (वय ४७ वर्षे)
हलिमा सलमानी (वय ७० वर्षे)
हरीश सोनावणे (वय ५७ वर्षे)

 

संपादन: सिद्धी भरत पाटील

Exit mobile version