ठाणे पालिकेने केले जिवंत व्यक्तीला मृत घोषित

ठाणे : ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे महिलेला तीन डोस दिल्याचे उदाहरण ताजे असताना आता चक्क ५५ वर्षीय तरुण देसाईंना जिवंतपणी मृत घोषित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिवंत माणसाला चक्क मृत असल्याचा फोन महापलिकेने करून खातरजमा करण्यात आली असून मृत असल्याची बाब कळताच सदर व्यतीच्या पायाखालची वाळू सरकली. या धक्कादायक घटनेने पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असल्याचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे.
‘तांत्रिक कारणामुळे चुकीचा गैरसमज झाला आहे. कोरोना रुंगाची यादी पुणे आरोग्य विभागातून प्राप्त होत असल्याने अशी चूक झाली असावी. रुग्ण बाधित झाल्यानंतर बरा होईपर्यंत महापालिका पाठपुरावा करत असते. त्यानंतर कुटुंबातील कोणाला कोरोनाची लागण झाली आहे का अशी देखील विचारपूस करण्यात येते. मात्र अश्या स्वरूपाचा फोन गेला असल्याने पुन्हा अशी चूक होणार नाही अशी खबरदारी घेण्यात येईल’ असं ठाणे पालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितलं आहे.