मुंब्र्यात ईदनिमित्त प्रचंड गर्दी

मुंब्रा: मुंब्र्यात ईद या सणापूर्वी रात्रीच्या वेळी दुकाने आणि बाजारपेठा सुरू असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून आलं. मात्र पोलीस आणि पालिका प्रशासनाने ठिकाणी कोणतीही कारवाई केली नाही. अमृत नगर ते कौसापर्यंत नागरिक कोरोनाचे कोणतेही नियम न पाळता रस्त्यावर फिरताना आढळले. या गर्दीकडे बघून आटोक्यात आलेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा हा मतदार संघ असून या ठिकाणी कोरोनाचे नियम मात्र पायदळी तुडवताना दिसत आहेत. आता या प्रकाराकडे मंत्री जितेंद्र आव्हाड कशा प्रकारे लक्ष देतात हे पाहावे लागेल.

Exit mobile version