Wed. Jun 29th, 2022

१६ वर्षांच्या विद्यार्थ्यांनी बनवले सोशल मीडिया ऍप

राज्यात कोरोना महामारीमुळे राज्यात टाळेबंदी लागू असल्यामुळे लहान मुलांनाही घरीच बसावे लागत आहेत. त्यामुळे मुलांकडे भरपुर वेळ असतो..या वेळेचा पुरेपूर उपयोग करत ठाण्यातील १६ वर्षाच्या दोन मुलांनी सोशियोचॅट नावाचे सोशल मीडिया ऍप तयार केले आहे. दोघांनीही पैसे न गुंतवता तब्बल ६.६दशलक्षची कंपनी उभी केली आहे.

अथर्व शिंदे आणि आयुष सिंघ या दोन मुलांना टाळेबंदीच्या काळात काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती. सुरुवातीपासून त्यांना कोडींगमध्ये रस होता. या दोन तरुणांनी लोकांचे मनोरंजन करण्यासाठी, तसेच एकमेंकाशी गप्पा मारण्यासाठी एक स्वतंत्र सोशल मीडिया ऍप तयार करण्याचे ठरविले. पण त्यासाठी गरज होती कोडींगच्या महितीची. आजकाल बऱ्याच कंपन्या आहेत ज्या कोडिंग शिकविण्यासाठी जवळजवळ लाख रुपये आकारतात. त्याही ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध आहेत.

कोणत्याही अशा महागड्या कोडिंग क्लासेसमध्ये न जाता या तरुणांनी एप्रिलपासून सोशियोचॅटची रचना तयार केली. लोगो आणि नावही निवडले गेले, त्यामध्ये त्यांनी एका सर्व्हरमध्ये मे पासूनच त्याची प्रोग्रामिंग सुरू केली. आणि अखेर जून २०२० मध्ये हे सोशल मीडिया अॅप तयार करण्यात ते यशस्वी झाले आहेत. अनेक अॅप मधून आपली माहिती चोरी होण्याची भिती असते. परंतू यामध्ये त्यांनी सुरक्षेची हमी देखील दिली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया या संस्थेतर्फे प्रमाणपत्रदेखील मिळाले आहे. आज त्या अॅप ची किंमत ६.६ दशलक्ष  एवढी आहे , अशी माहिती त्यांनी दिली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.