Sat. Jun 6th, 2020

बालाकोट येथील एअरस्ट्राईक माझ्या सल्ल्यानेच – शरद पवार

14 फ्रेब्रुवारी रोजी  पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ला झाला. साआरपीएफचे ४० जवान शहीद या हल्ल्यात झाले होते. बालाकोट येथे  एअरस्ट्राईकद्वारे  या हल्ल्याचा बदला घेण्यात आला.यात तीनशेहून अधिक दहशतवादी मारल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र, बालाकोट येथील  कारवाई आमच्या सल्ल्यानेच झाल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. चाकण येथे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रचार सभा झाली यावेळी शरद  पवार बोलत होते.

या सभेला अजित पवार, जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे आदी नेते उपस्थित होते.डॉ. कोल्हेंनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भूमिका साकारली. आपल्या अमोल कोल्हेंनी  इतिहास पुढं आणला आहे असं म्हणत त्यांनी कोल्हेंची स्तुती केली आहे.

काय म्हणाले शरद पवार ?

पुलवामा हल्ल्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक घेण्यात आली होती.

मी पूर्वी संरक्षण मंत्री असल्याने या बैठकीला हजर होतो पहिला प्रश्न मला विचारण्यात आला.

भारतीय जवानांना दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचे आदेश  द्या,  मीच असा सल्ला दिला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री सितारामण उपस्थित या बैठकीला  नव्हते.

शरद पवारांची माेंदीवर टीका ?

पुलवामा हल्ल्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या बैठकीला नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री सितारामण उपस्थित नव्हते.

आमची दिल्लीत बैठक सुरु होती आणि मोदी यवतमाळच्या दौऱ्यावर होते.

मैं चौकिदार हू, देश की सुरक्षा मेरे हात मे हैं. देश को कुछ होने नहीं दुंगा असे ते यवतमाळ मध्ये म्हणत आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन हे बोलायचं सोडून ही ५६ इंचची छाती यवतमाळ मधून हे बोलत होती.

 

 

पवार पुढे म्हणाले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *