Jaimaharashtra news

आशिया कप २०२० : टीम इंडियाच्या नकारामुळे पाकिस्तानने गमावलं यजमानपद

टीम इंडियाच्या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा धक्का लागला आहे. टीम इंडियाने पाकिस्तान मध्ये आशिया कपमध्ये खेळण्यास नकार दिल्याने पाकिस्तानला यजमानपद गमावावे लागले आहे.

यंदाच्या आशिया कप २०२० चे यजमानपद पाकिस्तानला मिळालं होत.

टीम इंडियाने सुरक्षेच्या कारणांमुळे पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळण्यास नकार दिला आहे.

दरम्यान आता पाकिस्तानचं यजमानपद रद्द झालं आहे. त्यामुळे आता आशिया कपच्या यजमानपदाचा मान दुबई, बांगलादेश किंवा श्रीलंका या देशांना मिळू शकतो.

तसेच आशिया कप स्पर्धा सप्टेंबर २०२० मध्ये खेळण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदाची आशिया कप स्पर्धा ही २० ओव्हरची खेळण्यात येणार आहे.

टी-२० वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना सराव व्हावा, या उद्देशाने ही स्पर्धा २० ओव्हरची ठेवण्यात आली आहे.

Exit mobile version