Wed. Jun 29th, 2022

पवारांच्या घरावरील हल्ल्याचे राज्यात पडसाद

एसटी संपाबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. संपकारी कर्मचारी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी धडकले. यावेळी कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत आंदोलन केले तसेच शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संपकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेला हल्ला निंदनीय असून या हल्ल्याचे आता राज्यात पडसाद उपटले आहेत. राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादीकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

नाशिक :

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद नाशिकमध्ये उमटले. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गांधीगिरी करत हल्ल्याचा निषेध केला आहे.

नागपूर :  

सिल्वर ओकवर झालेल्या घटनेचे पडसाद शनिवारी नागपुरातदेखील उमटले. नागपूरच्या व्हरायटी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत काळी रिबीन बांधून मुक आंदोलन केले.

भिवंडी  :

भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला. भिवंडीतील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शोएब खान यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे.

सोलापूर  :

शुक्रवारी पवारांच्या घरावर झालेल्या आंदोलनाविरोधात राज्यभरातून पडसाद उमटत असताना सोलापुर आणि जळगाव जळगावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली चार पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकदरम्यान शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. तर याप्रकरणी जळगाव मधूनही कार्यकर्त्यांकडून निषेध नोंदवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.