Thu. May 6th, 2021

रेमडेसिवीरचे जुने आणि नवे दर..

मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती ही फार गंभीर झाली आहे. दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना वैद्यकीय सुविधांचा अभाव अधिक स्पष्टपणे दिसून येत आहे. देशाची आर्थिक परिस्थिती सुद्धा ढासळल्यानं अनेक गोष्टीचा सामाना हा सामन्य नागरिकांना करावा लागत आहे. तसेच देशात कोरोना लसीसोबतच रेमडेसिवीर इंजेक्शनचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. आधीच कोरोनामुळे रोजगार ठप्प झाल्यामुळे नागरिकांना आर्थिक अडचणीतून जावे लागत आहे. मात्र आता सामान्य जनतेसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रेमडेसिवीर या इंजेक्शन किंमत कमी झाली आहे. यापुर्वी रेमडेसिवीर इंजेक्शनचा खर्च हा लोकांना परवडत नव्हता . त्यामुळेच केंद्राने आता रेमडेसिवीरच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे

देशाचे आरोग्य मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी याबाबत माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच या औषधाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता. त्यानंतर आता इंजेक्शनच्या दराबाबत नवीन पत्रक आरोग्य मंत्रालयाने जारी केले असून रेमडेसिवीरच्या किंमती झाल्यानं सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

रेमडेसिवीरचे जुने आणि नवे दर..

कॅडीला हेल्थ केअर

2,800 रुपये. (जुना दर)

899 रुपये. (नवा दर)

बायोकॉन

3,950 रुपये. (जुना दर)

2,450 रुपये. (नवा दर)

मायकल फार्मा

4,800 रुपये. (जुने दर)

3,800 रुपये. (नवे दर)

ज्युबिलंट

4,700 रुपये. (जुना दर)

3,400 रुपये. (नवा दर)

 हेटेरो हेल्थ केअर
5,400 रुपये. (जुना दर)

3,490 रुपये. (नवा दर)

 सिप्ला लिमिटेड

4,000 रुपये. (जुने दर)

3,000 रुपये. (नवे दर)

राज्य सरकारने या इंजेक्शनचा काळाबाजार थांबवण्यासाठी मेडिकलमधून याची विक्री करण्यात बंदी घातली आहे. तसेच दर कमी झाले असले तरी रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे केवळ रुग्णालयांमध्ये आणि ठराविक सेंटरमध्येच हे औषध मिळणार असल्याचं सरकार कडून सांगण्यात आले आहे. मात्र रुग्णालयांमध्येही याचा वेळेवर पुरवठा होत नसल्याचं हे वारंवार समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *