Budget 2020 : अर्थसंकल्पातून दिल्लीकरांना सावत्र वागणूक – अरविंद केजरीवाल

लोकसभेत आज शनिवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पातून अनेक निर्णय घेतले गेले. तसेच मोठ्या घोषणा देखील करण्यात आल्या.
या अर्थसंकल्पावर अनेक नेत्यांनी संमिश्र अशा प्रतिक्रिया दिल्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या अर्थसंकल्पाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले केजरीवाल ?
दिल्लीकरांना या अर्थसंकल्पातून अनेक आशा अपेक्षा होत्या. परंतु दिल्ली करांसोबत सावत्र व्यवहार करण्यात आला,अशी खंत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली.
भाजप दिल्लीला प्राथमिकतेत मोडतच नाही. मग दिल्लीकरांनी भाजपला का मतदान करावं, असा उद्विघन सवालही केजरीवाल यांनी केला आहे.
तसेच निवडणुकीच्या आधीच जर भाजप दिल्लीकरांना निराश करत असेल, तर भाजप निवडणुकीनंतर आश्वासनपूर्ती करेल का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्याच्या काही तासांआधी केजरीवाल यांनी एक ट्विट केलं होतं.
दिल्लीकरांच्या हितासाठी या अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल, अशी आशा व्यक्त केली गेली होती.
तसेच निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीला अर्थसंकल्पात अधिक प्राधान्य दिलं जाईल, अशी आशाही व्यक्त करण्यात आली होती.
तसंच अर्थसंकल्पात दिल्लीच्या वाट्याला काय येतं, यावरुन भाजपला दिल्लीकरांची किती काळजी आहे, हे लक्षात येईल. या आशयाचं ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केलं होतं.
अधिक वाचा : Budget2020 : LIC खासगी झाली, पैसे मिळण्याचा भरवसा गेला- छगन भुजबळ
“सर्वाधिक कर देणाऱ्या मुंबई आणि महाराष्ट्राची मोदी सरकारकडून घोर निराशा”