कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा मोठा निर्णय

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात आणि प्रत्येक राज्यात खबरदारी घेतली जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना उपाय योजना आखल्या आहेत. भाजपने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे.
येत्या महिन्याभरात भाजप कोणत्याही प्रकारच्या आंदोलनात तसेच विरोध प्रदर्शनात सहभागी होणार नाही. याबाबतची माहिती भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिली आहे. जेपी नड्डा यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सर्व नेत्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. भाजपाच्या पक्ष बैठकीत कोरोनामुळे भाजपा पुढील 1 महिना कोणत्याही आंदोलनात सहभाग घेणार नाही अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान कोरोनामुळे राज्यातील सर्व आगामी निवडणुका अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषेदेत दिली.
राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित
नागरीकांना देखील काळजी घेण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन सरकारने केल आहे. या रोगाचा प्रसार रोखावा यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आदेशही सरकारने दिले आहेत.
राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे.