Wed. May 18th, 2022

पालघरमध्ये मोटारसायकलवरून नेला सहा वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पालघरमध्ये आरोग्य विभागाचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पालघरमधील जव्हार येथे कुटुंबाकडे पैसे नसल्यामुळे मृतदेह नेण्यास रुग्णवाहिका नाकारली असल्याचा प्रकार घडला आहे. मृतदेह नेण्यास रुग्णवाहिकेने नकार दिल्यामुळे सहा वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह मोटारसायकलवरून नेण्यात आला.

पैसे नसल्याने रुग्णालय प्रशासनाने मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका नाकारल्यामुळे पित्याने आपल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह मोटारसायकलवरून नेला. पित्याला जव्हार ते पायरवाडी असा ३०पेक्षा अधिक किलोमीटर पायपटी करत आपल्या मुलाचा मृतदेह न्यावा लागला.

देशात ७३व्या प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना, पालघरमध्ये हा प्रकार घडल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. जव्हारमधील पायरवाडी येथील अजय पारधी या सहा वर्षीय चिमुकल्याचा रुग्णायलयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, कुटुंबाकडे मृतदेह नेण्यास पैसे नसल्याने रुग्णायल प्रशासनाने रुग्णवाहिका नाकारली. त्यामुळे पित्याला मोटारसायकलवरून आपल्या लेकाचा मृतदेह न्यावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.