Tue. Oct 26th, 2021

लग्न जमवत नाहीत म्हणून मुलाचा आई-वडीलांवर चाकूने हल्ला

आताची तरूणाई स्वत:च्या हट्टापायी कोणत्या थराला जाईल हे सांगणे जरा कठीणच आहे. दरम्यान नांदेडमध्ये एका मुलाला लग्न करण्याचा हट्ट चांगलाच महागात पडला आहे. या हट्टापायी त्याची रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

नांदेड मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. लग्न का करुन देत नाहीत म्हणून मुलानेच आई-वडिलांवर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना नांदेडमध्ये घडली आहे.

नांदेड शहरातील उच्चभ्रु वसाहत असलेल्या विवेकनगर परिसरात पेशाने डॉक्टर असलेले संजय लाटकर हे कुटुंबासह राहत होते. यांना 29 वर्षीय वल्लभ नावाचा मुलगा आहे. याने लग्न जमवण्याची घरच्यांकडे मागणी केली होेती.

वल्लभने लग्न जमवतं नाहीत म्हणून सुरवातीला आई-वडीलांसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर तो वाद एवढ्या टोकाला गेला की चक्क वल्लभने भाजी कापण्याच्या चाकूने आई-वडीलांवर हल्ला केला.

या हल्यात आई-वडील किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी वडील डॉ. संजय लाटकर यांनी दिलेल्या तक्रारी वरुन मुलगा वल्लभवर भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *