Thu. Sep 29th, 2022

करीरोडमधील बहुमजली इमारतीला भीषण आग

‘तर त्या व्यक्तीचे प्राण वाचले असते’ – महापौर किशोरी पेडणेकर
मुंबई : मुंबईतील करीरोड येथील वन अविघ्न पार्क या इमारतीत 19 व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली. या दरम्यान लागलेल्या भीषण आगीला नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र या घटनेत एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे ‘इमारतीच्या कर्मचाऱ्यांनी आणीबाणीच्या प्रसंगी प्रसंगवधान दाखवले असे तर त्या व्यक्तीचे प्राण वाचले असते,’ असे मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

अविघ्न पार्क या 60 मजल्या इमारतीच्या 19व्या मजल्यावर भीषण आग लागली. इमारतीला आग लागल्याक्षणीच एका व्यक्तीने जीव वाचवण्यासाठी मजल्यावरून खाली उडी मारली. या व्यक्तीला त्वरीतच उपचारांसाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. लागलेल्या आगीत इमारतीती काही जण जखमी झाले आहेत.
सध्या अग्निशमन दलाकडून इमारतीत कूलिंगचे काम सुरू असून इमारतीला लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाने नियंत्रम मिळवले आहे. इमारतीला लागलेल्या आगीत अडक

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.