Wed. May 19th, 2021

बिस्किटच्या पुड्यातील बिस्किटं न विचारता खाल्याने चौथीतल्या मुलाला मारहाण

औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात पाच रुपयांच्या बिस्किटावरुन चौथीतल्या मुलाला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादाय बाब म्हणजे ही मारहाण विद्यालयाच्या संस्थाचालकाने केल्याची घटना घडली. पाच रुपयांचा बिस्किटाचा पुडा न विचारता घेऊन दोन बिस्किटे खाल्यामुळे मारहाण केल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय घडलं ?

निल्लोड गावातील संत ज्ञानेश्वर विद्यालयात पाच रुपयांच्या बिस्किटावरुन मोठा वाद निर्माण झाला.

संस्थाचालकाने चक्क चौथीतल्या मुलाला वायरने डोक्यावर गंभीर मारहाण केल्याचे समजते आहे.

निरंजन जाधव असे मुलाचे नाव असून महाराज रामेश्वर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालक भेटायला गेले असताना मुलाला मारहाण केल्याची माहिती उघडकीस आली.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *