Tue. Sep 27th, 2022

बांगलादेशमध्ये भीषण आग, 56 जणांचा मृत्यू

बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकामध्ये रसायनाच्या गोदामाला आग लागली.

आगीत आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.

सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

 या भीषण आगीचे नेमकं कारण काय?

  • ढाकामध्ये रसायनाच्या गोदामाला आग लागली. केमिकल्स, बॉडी स्प्रे आणि प्लास्टिकच्या दुकानही आगीत जळाली.
  • पाच इमारतींमध्ये ही आग पसरली होती.यामुळेचं या आगीत जीवितहानी झाली.
  • दुकानांमुळे आग प्रचंड वाढली आणि रहिवाशी इमारतींमध्ये पसरली.
  • लोकांना आग लागलेल्या इमारतींमधून बाहेर पडण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने 56 जणांचा मृत्यू झाला आहे.तर अनेक जण जखमी झाले आहेत.
  • ‘गॅस सिलेंडरमुळे ही आग लागली असल्याची शक्यता असून इमारतींमध्ये केमिकल्सचा साठा असल्याने आग पसरली असावी’ अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
  • आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मृतांचा आकडा अजून वाढू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.