Tue. Aug 9th, 2022

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी मानले एकनाथ शिंदे यांचे आभार

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बीस्वा सरमा यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे ट्विट करून मानले आभार मानले आहेत आसाम पूरग्रस्तांना शिवसेनेचे सर्व आमदार आणि सहयोगी आमदारांनी मिळून ५१ लाखांची मदत देण्याची माहिती ट्विट करून दिली आहे. विशेष बाब म्हणजे त्यांनी हे ट्विट मराठीतून केले आहे.मराठी मध्ये ट्विट करून आभार मानले आहेत.एकनाथ शिंदे गटाने आसाममधील पूरग्रस्तांसाठी ५१ लाखांची मदत जाहीर केली आहे. याची माहिती एकनाथ शिंदे यांनी ट्विटद्वारे दिली होती.

आसाममध्ये आठवडाभर मुक्काम करणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या इतर बंडखोर आमदारांनी आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५१ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. आसामच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याची घोषणा केली होती. ही मदत मिळाल्यानंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी मराठीतून सर्वांचे आभार मानले आहेत. याची आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा मराठीतून केलेल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांचे धन्यवाद. आपण आसामच्या महापुरात नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी ५१ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री मदत निधीला केली. आम्ही आपले खुप आभारी आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.