‘मुख्यमंत्री लिहिणार पंतप्रधानांना पत्र’

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून अनेक आरोप केले आहेत. तसेच याप्रकरणी नवाब मलिकांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. बॉलिवूडची बदनामी थांबवा, याबाबत मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र लिहिणार असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांकडे मागण्या केल्या आहेत. क्रूझ पार्टी प्रकरणातील आरोप धक्कादायक असल्याचे नवाब मलिक यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी नवाब मलिकांनी केली आहे. मात्र मलिकांनी केलेली मागणी मुख्यमंत्र्यांनी झिडकारली आहे. महाविकास आघाडीच्या पुढाकाराने चौकशी करण्यासाठी नवाब मलिक आग्रही होते. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी मलिकांची मागणी झिडकारली आहे.