Tue. Aug 9th, 2022

मुख्यमंत्र्यांनी दिल्या माजी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मात्र शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडामुळे झालेल्या दुःखाचं आणि राजकीय संकटाचं सावट या वाढदिवसावर आहे. अशातच आता बंडखोरांचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. यावेळी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंता उल्लेख ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा न करता ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री’ असा केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची रीघ लागलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी केक कापत आपला वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी मातोश्रीबाहेर असलेला फुलांनी सजवलेला धनुष्यबाण विशेष लक्षवेधी ठरत आहे. वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी यापूर्वी आवाहन केलं होतं की, आपल्या वाढदिवसानिमित्त भेटी, पुष्पगुच्छ न देता प्रतिज्ञापत्र द्यावीत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.