Tue. Jun 18th, 2019

कोस्टल रोडचे काम थांबवण्याचे कोर्टाचे आदेश

37Shares

महापालिका आणि शिवसेनेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचे काम थांबवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. 23 एप्रिलला पुढील सुनावणी होणार असून महापालिकेला आता हे काम थांबवावे लागणार आहेत. कोस्टल रोड मुळे ब्रिचकँडी येथिल टाटा उद्यान नामशेष होणार आहे.तसेच मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येईल या कारणामुळे उच्च न्यायालयाकडून हे आदेश देण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणावर परिणाम होणार असल्याची याचिका दाखल करण्यात आली होती. यामुळे 23 एप्रिलच्या पुढील सुनावणीपर्यंत भराव टाकण्याचे आणि वरळी सीफेसजवळ डेब्रिज टाकण्याचे काम थांबवण्यात आहे.

कोस्टल रोडचे काम थांबविण्याचे कारण काय?

दक्षिण मुंबईतील मरिन ड्राइव्हपासून कांदिवलीपर्यंत कोस्टल रोड उभारण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे.

यामुळे मासेमारीवर परिणाम होणार असल्याने वरळीतील मच्छिमारांनी या प्रकल्पाला विरोध करत याचिका दाखल केली.

यामध्ये टाटा गार्डन परिसरातील दोनशे झाडांचा अडथळा असल्याने ती तोडण्याचा प्रस्ताव पालिकेने ठेवला आहे.

यामुळे कोस्टल रोडमुळे भावी पिढ्यांना पक्षी पाहायला मिळणार नाहीत असं ही सांगण्यात आलं आहे.

कोस्टल रोडचा पर्यावणावर कसा परिणाम होतोय याचा अभ्यास करण्याआधीच महापालीकेने काम सुरू केले होते.

२३ एप्रिलच्या पुढील सुनावणीपर्यंत भराव टाकण्याचे आणि वरळी सीफेसजवळ डेब्रिज टाकण्याचे काम थांबवण्यात आहे.

37Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *