Fri. Aug 12th, 2022

काँग्रेस म्हणतेय दादांच्या पुण्याच्या भाषणाचा राग देहूत निघाला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवरी संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपस्थित वारकऱ्यांना संबोधित केले. तर विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते यांचे भाषण झालं. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं नाही. त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या पुण्याच्या भाषणाचा राग देहूत निघाला असल्याचे काँग्रेसकडून म्हटले जात आहे. अजित पवारांना पंतप्रधानांच्या सभेत बोलू न देणे हे जाणिवपूर्वक घडले असल्याचे काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी सांगितलेआहे.

सचिन सावंत यांनी ट्विट केले की, ‘अजित पवारांना जाणीवपूर्वक सभेत बोलू न दिले. गतवेळेस दादांनी पंतप्रधानांसमोर राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची शिवराय व महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातील वक्तव्ये निदर्शनास आणली होती. त्याचाच राग निघालेला दिसत आहे,’ असे त्यांनी ट्विट केल.

पुणे मेट्रोच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार काय म्हणाले?

देहू कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांच्या भाषण का नाही? – सुप्रिया सुळे

देहू कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांच्या भाषण का नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार यांना भाषण करायचं होतं याबाबत पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिण्यात आलं होतं. मात्र, पीएमओकडून त्यांना लेखी उत्तर आले नाही. हे अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रयांच्या, पालकमंत्र्यांच्या आणि आमच्या नेत्याचा प्रोटोकॉलनुसार सन्मान झालेला नाही. त्यामुळे हे धक्कादायक असून चूकीचे असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

1 thought on “काँग्रेस म्हणतेय दादांच्या पुण्याच्या भाषणाचा राग देहूत निघाला

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.