Sun. Jun 20th, 2021

अबब! सारंगखेड्याच्या घोडेबाजारात ‘या’ घोड्याची किंमत 10 कोटी!

सारंगखेडा घोडे बाजाराने यंदा दहाच दिवसात कोट्यवधींची उलाढाल केली आहे. या बाजारात चर्चा होती ती ‘शान’ घोड्याचीच. दहा कोटींपेक्षा जास्त किंमत असलेला ‘शान’ घोडा सारंगखेडा घोडेबाजाराची खरोखरच शान ठरला आहे.

पुष्कर मेळाव्यानंतर घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा घोडेबाजार देशातील सर्वात जुन्या घोडे बाजारांपैकीचा एक. त्यामुळे अश्वशौकीनांसाठी हा घोडे बाजार नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदु असतो. या ठिकाणी दाखल होणारे मारवाड, पंजाब, सिंध प्रांतातील नुकरा जातीचे घोडे आपल्या विविध कलागुणांनी नेहमीच अश्वशौकीनांना भुरळ घालत असतात. यंदा देखील या सारंगखेडा असेच काहीचे मन वेधणारे अश्व दाखल झाले

‘शान’ ठरला यंदाचं आकर्षण

पंजाबमधून दाखल झालेला मारवाड जातीचा ‘शान’ नावाचा अश्व यंदा सर्वांच्याच गळ्यातला ताईत बनला.

अवघ्या दोन वर्षांच्या ‘शान’ने आत्तापंर्यत देशातील घोड्याच्या सहा शर्यतींमध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय.

सारंगखेडा घोडे बाजारातील स्टायलीश घोड्याचा किताब देखील त्याने मिळवला आहे.

या घोड्याला तब्बल एक दोन नव्हे तर दहा कोटींना मागणी झाली असल्याचा त्याच्या मालकाने दावा केलाय.

मात्र तरीही आपण शानला विकणार नसल्याचा दावा त्याचे मालक करत आहेत.

शानला लागणारा खुराक आणि त्याची ठेवली जाणारी बडदास्त यांमुळे शानची किंमत करोडोंमध्ये आहे.

‘शान’ प्रमाणेच 50 लाख किंमत असणारा राजवीर देखील अश्वशौकींनांना भुरळ घालतोय.

आतापर्यंत या घोड्याला 11 लाखांची मागणी आली असून 51 लाखांच्या बोलीखेरीज आपण त्याला विकणार नसल्याचे त्याचे मालक म्हणतात.

सारंगखेडा घोडे बाजारात तीन हजार घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले.

जवळपास आठशे घोड्याच्या विक्रीतून करोडोंची उलाढाल झाली. या घोड्यामध्ये असलेल्या शुभ-अशुभ गोष्टी आणि त्यातील वैशिष्टपूर्ण बाबींमुळेच घोड्यांच्या किमती दहा कोटींच्या घरात गेल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे या घोडे बाजारात सध्या पन्नास हजारांपासून ते थेट दहा कोटींपर्यंतचे घोडा दाखल झाल्याने अश्व खरेदीदार घोडे बाजाराला आवर्जून भेट देतात.

अश्वशौकिनांसाठी या ठिकाणी सांस्कृतिक मेजवानीसोबत अश्वांच्या विविध शर्यती हा देखील आकर्षणाच खास केंद्रबिंदू ठरतोय. अशातच या ठिकाणी नृत्यावर ठेका धरणारे अश्व आणि त्यावर कर्तबगारी करणारे अश्वाचे मालक आपले कलागुण सादर करताना दिसतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *