Mon. Nov 29th, 2021

चिखलदरा पर्यटनस्थळाच्या गतीसाठी आणि पाणी समस्याच्या निवारणाकरीता डॅमची निर्मिती

मेळघाटात सिडकोच्या हद्दीत ३८ कोटी रुपयांच्या निधीने भव्य ब्रम्हांसती डॅमची निर्मिती होणार आहे. अमरावतीच्या खासदार नवणीत राणा यांच्या पुढाकाराने हे काम केले जाणार आहे.

खासदार नवनीत रवी राणा यांनी आज ब्राम्हसति डॅमच्या जागेची पाहणी केली. दरम्यान लवकरच चिखलदरा येथे या डॅमच्या कामाला सुरुवात होणार आहे.

अमरावतीत चिखलदरा येथे मोथ्यात पावसाळ्यात भीषण पाणी टंचाई राहते. चिखलदरा येथे पिण्याच्या पाण्याचा दुर्भिक्ष आहे. दुष्काळ असल्याने पाण्यासाठी पायपीठ ही रोजची बाब झाली आहे.

या पाणी समस्यामुळे चिखलदराच्या पर्यटनावर परिणाम होत आहे.

ही बाब लक्षात घेता खासदार नवणीत राणाांनी चिखलदऱ्यात ब्राहसती डॅमचा प्रस्ताव तयार केला. तसेच त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय.

लवकरच चिखलदऱ्यात पाणी समस्या सुटणार असून पर्यटन संख्या देखील वाढणार आहे.

यासाठी नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांसोबत ब्राहसती डॅमच्या जागेची पाहणी केली.

पाण्यासाठी पायपीठ हे रोजचंच काम. गावातील विहिरी कोरड्या पडल्या नदी नाले आटले. परिसरातील विहिरी कोरड्या पडलेल्या. चिखलदरा च्या अनेक गावात अजूनही पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे.

काही गावात टँकर येतो मात्र काही ठिकाणी रस्ते नसल्याने टँकर पोहचणे देखील कठीण आहे. हे आहे चिखलदरा तालुक्यातील मोत्था गाव.

उन्हाळ्यापासून या गावात भीषण पाणी समस्या आहे. गावात पाण्यासाठी झुंबळ होते.

शाळकरी मुलींना देखील पाणी भरण्यासाठी या विहिरीवर गर्दी करावी लागते. यामुळे शाळेत जायला उशीर होतो. त्यामुळं या पाणी समस्यामुळं शिक्षणावर देखील परिणाम होत आहे या उद्देशाने हा ब्राहसती डॅम महत्वाचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *