Fri. Jul 30th, 2021

साचलेल्या पाण्यातूनच सुरु आहे वाहनांचा धोकादायक प्रवास

वसई विरार मध्ये रविवारी तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे साचलेले पाणी अद्यापही काही परिसरात कायम आहे. दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या सनसिटी गास रस्ता तीन दिवसांपासून पाण्याखालीच आहे .या रस्त्यावरील पाण्याचा निचरा न झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. हा मार्ग सोडून पर्यायी मार्ग उपलब्ध आहे मात्र त्यासाठी ८ ते १० किलोमीटर जास्त प्रवास करायला लागत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.

निर्मळ, गास, वाघोली आदी गावांना जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावर गुढगाभर पाणी साचल्याने हा मार्ग प्रशासनाकडून बंद करण्यात आला आहे. तरीही काही वाहनधारक या मार्गानेच जाणे पसंत करत असल्याने पाण्यात अडकून वाहने बंद पडण्याचे प्रसंग घडत आहेत.. दोन दिवसांपूर्वी याच रस्त्यावर एक एसयुव्ही कार पाण्यात वाहून गेली होती.. त्यानंतर नागरिकांनी दोरखंड वापरून वाहून गेलेल्या कारला पाण्याबाहेर काढले होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *