Fri. Jan 28th, 2022

कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर दिवसभरात शिक्कामोर्तब?

   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये कृषी कायदे मागे घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मोदींनी घोषित केलेले तीनही कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. १९ नोव्हेंबरला यासंदर्भातली घोषणा पंतप्रधानांनी केली होती. त्यानुसार या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे. विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संबंधित विधेयक संमत करण्यात येणार आहे. त्यानंतरच मोदी सरकारने लागू केलेले तिनही कृषी कायदे घटनात्मक प्रक्रियेनुसार, रद्द होणार आहेत.

  मुळात जुना कायदा नवा कायदा करुनच रद्द केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत पंतप्रधानांच्या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी तीन कायद्यांसाठी तीन स्वतंत्र विधेयक किंवा तिन्हींसाठी एक विधेयक २९ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात लोकसभा किंवा राज्यसभेत मांडले जाणार आहे. हे विधेयक मांडण्यात आल्यानंतर, दोन्ही सभागृहाने चर्चा किंवा चर्चा न करता मंजूर केल्यानंतर ते राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवले जाईल. राष्ट्रपतींची मंजुरी मिळताच तिन्ही कृषी कायदे रद्द केले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *