Thu. Sep 16th, 2021

डेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता

डेल्टा व्हेरियंटबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा धोक्याचा इशारा दिला आहे. डेल्टा व्हेरियंट जवळपास १३२ देशात पसरला असून लसीकरण न झाल्यास तो अधिकच घातक ठरेल. परिस्थिती बिघडण्यापूर्वीच डेल्टाचा प्रसार रोखावा, असा इशारा आरोग्य संघटनेनं दिला आहे. गेल्या आठवड्याच डेल्टाचे ४० लाख नवे रुग्ण जगभरात आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० कोटीच्या पुढे गेली आहे. त्यामुळे भविष्यातही डेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरु शकतो, त्यामुळे वेळीच लसीकरण करणं गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *